अशी चर्चा सध्या सगळ्याच माध्यमान वर होती ये आणि ह्या चर्चे चा कारण म्हणजे गुजरात हाय कोर्टाचा एक निकाल . गुजरात हाय कोर्टाने पंतप्रधान मोदी ह्यांच्या डिग्री च्या प्रकरणात निकाल देतांना मोदी ह्यांचे डिग्री चे डिटेल्स द्यायला नकार दिला आहे आणि डिग्री चे डिटेल्स माघितल्या मुळे आम आदमी पक्षा चे सर्वे सर्वा अरविंद केजरीवाल ह्यांना २५,००० चा दंड देखील ठोठावला आहे त्या वर प्रश्न उपस्तित करतांना केजरीवाल म्हणतात देशाचे पंतप्रधान किती शिकले हे जाणान्या चा देखील जनते ला अधिकार नाही का ? त्यांची डिग्री माघितली तरी शिक्षा होणार का अशे एक ना अनेक प्रश्न केजीरीवाल ह्यांनी उपस्तित केले आणि ह्या मुळेच पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या शिक्षणाचा वाद निर्माण झाला आहे.
त्या मुळे मोदी ह्यांच्या डिग्री चा नेमका वाद काय आहे,त्यांची डिग्री खरंच फेक आहे का आणि मोदींच्या डिग्री संबंधी माहिती गुप्त ठेवली जात आहे का हेच आपण ह्या आर्टिकल मधून जाणून घेऊया
वादाचे कारण
पण केंद्रीय माहिती आयोग माहिती पुरवण्यास टाळाटाळ करते किंवा माहिती पुरवण्यास अडथळे निर्माण करते आहे आसा देखील केजरीवाल ह्यांचा आरोप होता .त्यामुळे केंद्रीय माहिती आयोगा ने हि माहिती RTI Enquiry म्हणून स्वीकारली आणि त्या नुसार केंद्रीय माहिती आयोगाने दिल्ली विद्यापीठ तसेच गुजरात विद्यापीठ ह्यांना श्री नरेंद्र मोदी ह्यांच्या डिग्री बद्दल संपूर्ण माहिती देण्याचे निर्देश दिले मात्र ह्या निर्देशा च्या विरोधात गुजरात विद्यापीठाने कोर्टात जाण्याचे ठरवले आणि श्री नरेंद्र मोदी ह्यांच्या डिग्री बद्दल संपूर्ण माहिती देण्याचा अधिकार हा RTI Enquiry मध्ये येत नाही आणि हा चुकीचा निर्णय आहे असं गुजरात विद्यापीठा चं म्हणणं होतं आणि ह्याच याचिके वर निर्णय देतांना ३१ मार्च २०२३ ला गुजरात उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे आणि ह्या मध्ये केंद्रीय माहिती आयोगा चा निर्णय रद्द ठरवला आहे आणि शैक्षणिक माहिती देणं हा वयक्तिक भाग असल्याची टिप्पणी देखील केली आहे आणि डिग्री चे डिटेल्स जाहीर करण्यास नकार दिला आहे.
संशयाचे कारण
ह्या अगोदर २०१४ मध्ये देखील हंसराज जैन ह्या व्यक्ती ने १९७८ मध्ये N आणि M ह्या दोन अक्षरां पासून चालू होणारे कोणती लोकं पास झाली आहे ह्याचे डिटेल्स माहिती अधिकार च्या अंतर्गत माघितले होते पण रोल नंबर माहित नसल्या कारणाने अशी माहिती देणं अवघड असल्याचं सांगून माहती देण्यास नकार दिला . आणि अशे काही ना काही कारण सांगून नरेंद्र मोदी ह्यांची माहिती सार्वजनिक आजतागायत करण्यात आली नाही आणि ह्या मुळेच विरोधकांना मोदी ह्यांच्या शिक्षणा बद्दल संशय निर्माण होतो आणि हाच संशय दूर करण्यासाठी अमित शाह आणि अरुण जेटली ह्यांनी ९ मे २०१६ ला पत्रकार परिषद घेऊन मोदींची BA आणि MA अश्या दोन्ही डिग्र्या दाखवल्या होत्या.
पण ह्या वर केजरीवाल ह्यांनि त्यावर देखील आरॊप करत म्हणाले कि जाहीर केलेल्या डिग्री मध्ये मोदींच्या नावाची स्पेल्लिंग वेगवेगळी आहे असं म्हणत मोदींच्या डिग्री बद्दल पुन्हा एकदा संशय घेतला.
Arvind Kejriwal on Modi degree certificate |