Maharashtra Police : 'आर्मी'मध्ये भरतीचे आयुष्यभराचे स्वप्न. परीक्षा पास होऊनही पोलीस 'व्हेरिफिकेशन'चा अडथळा आला. देशसेवेचे स्वप्न भंग होण्याच्या भीतीने हताश झाला असतानाच शेवटचा आशेचा किरण म्हणून उपमुख्यमंत्री यांच्याशी फेसबुकद्वारे संपर्क साधला अन् चमत्कार झाला. "मी देवेंद्र फडणवीस बोलतोय", असा फोन आला अन् शुभमला जणू देवच पावला!.
शुभमने सांगितले की, पोलीस 'व्हेरिफिकेशन'मध्ये आलेले अडथळे सुटता सुटत नव्हते. हातातोंडाशी आलेली नोकरी आणि गेली याच अपेक्षेने घरी बसलो. जीव कासावीस झाला. आई-वडिलांच्या कुशीत डोके ठेऊन मोठमोठ्याने रडत होतो. 'आर्मी'मधे जाऊन देशसेवा करण्याच स्वप्न भंगले होते. डोळ्यापुढे संपूर्ण अंधार होता. एखदा फेसबुक स्क्रोल करत असताना देवेंद्रजी फडणवीस यांची फेसबुक अपडेट पुढे आली. माझ्यासोबत झालेला प्रकार देवेंद्रजींना सांगून काय होतेय का, याची चाचपणी सुरु केली. देवेंद्रजींच्या पोस्टवर रोज लाईक कमेन्ट करणाऱ्या २-३ कार्यकर्त्यांना फेसबुक मेसेज केले."